रस्त्यावरील होणार्या छळणूकी विरोधात उभे राहा

 
लेखक - जाणवी रविंद्र माने 

नमस्कार मी जानवी माने देऊर सारख्या छोट्याश्या गावात राहते. शिक्षण आणि घर इतकाच माझ रोजच्या  ठरलेल्या  गोष्ठी पण आमच्या माहाविद्यलयात एक प्रकल्प आला रेड डॉट फौंडेशन चा त्यात माझ नाव देण्यात आल . मला वाटल असेल रोजचच पण खरच सांगते ज्या वेळेला आमच प्रशिक्षण चालू झाल त्या वेळेला माझे डोळे उघडले कि किती तरी गोष्ठी आहे ज्या आपल्याला माहिती नाही .आणि त्या माहिती असण गरजेच आहे   आज महिला आणि मुलींवर होणारे अत्याचार आपण रोज ऐकत असतो पाहत असतो परंतु त्यावर आवाज कोणीही उठवत नाही , शिवाजी जन्मावा पण शेरांच्या घरात अशी समाजात परस्थिती आहे . जो पर्यंत आपल्या सोबत काही घडत नाही तो पर्यंत कोणीही काही बोलत नाही .परंतु माला प्रशिक्षणाच्या माध्यमातून अत्याचार म्हणजे काय ,त्याचे प्रकार काय असता आणि त्यसंदर्भातील सर्व माहती मिळाली . त्या मधील च एका विषयावर आज मी माहिती सांगणार आहे . कि जो विषय मलां खूप चांगल्या समजला आणि तो मी च्या जीवनात वापरू शकते .

     तो म्हणजे रस्त्यावरील होणार्या छळवनूकी विरोधात उभे राहा . सर्वप्रथम रस्त्यावर होणारी छळवनूहेक म्हणजे काय हे  आपल्यला माहिती असण गरजेच आहे.त्यामध्ये पाठलाग करणे , विनाकारण जवळ उभे राहणे, हावभाव करणे, ईशारे करणे, शारीरिक स्पर्श करणे, धक्का देणे , या सारख्या प्रकारांना म्हणतात छळ .या सारखे प्रकार आपण रोज पाहत असतो कोणा सोबत तरी  या गोष्ठी घडत असतात परंतु कोणीही मदतीला जात नाही किंवा मध्ये पडत नाही. तुम्हाला काय वाटत कोणी का मदत करत नसेल कारण लोकांना भीती वाटते कि उद्या आपल्यला काही त्रास नको,  सार्वजनिक ठिकाणी आपल्या सोबत असे काही प्रकार घडले तर त्याचा परिणाम हा आपल्या मानसिकते वर मोठ्या प्रमाणात होत असतो, आपले मानसिक स्वास्थ बिघडते आणि नकळत त्याचा परिणाम आपल्या सामाजिक जीवनावर होत असतो .रस्तावर अशे प्रकार होत असताना आपण कधी हा विचार करत नाही त्या व्यक्तीला काय वाटत असेल तिला काय त्रास होत असेल ,सर्व सामन्या पणे लोक मदत करत नाही कारण त्यांना वाटते कि मीच का करू ? मला काही घेण देन नाही , बाकी कोणी काही करत नाही मी का करू ? माझा या गोष्टीशी काहीही संदर्भ नाही अश्या करणान मुले लोक मदत करत नाही .परंतु आपण मदत केली पाहिजे मध्ये पडल पाहिजे त्यासाठी मी तुम्हाला काही पद्धती सांगणार आहे कि ज्या वापरून तुम्हीई लोकांना मदत करू शकता . यात ५ D पद्धती आहे त्या पुढील प्रमाणे आता आपण समजून घेऊया .

 

  1. विचलित करणे 
  2. प्रतिनिधी
  3. दस्तावेज 
  4. विलंब 
  5. थेट 

 

  1. विचलित करणे : –  एखादी घटना आपल्या समोर घडत असेल एखादी व्यक्र्ती मुलीची छेड काढत असेल आणि ते आपल्यांना बघवत नसेल तर आपान त्या त्रास देणारा व्यक्तीचे लक्ष विचलित करू शकतो म्हणजेच त्या व्यक्तीला ती कृती करण्या पासून थांबू शकतो , जेणे करून त्या मुलीला त्या ठिकाणाहून पळून जाता येईल किंवा आपण त्या व्यक्तीला पत्ता विचारू शकतो किंवा त्या मुली सोबत ओळख दाखवू शकतो अश्या पद्धतीने आपान विचलित करू शकतो . अस केल्या मुले त्या व्यक्तीला दिलासा मिळू शकतो .
  2. प्रतिनिधी :-  या पद्धती मध्ये आपल्या समोर एखादी घटना घडत असले ज्या वेळी आपल्याला स्वतः मदत करणे शक्य नसेल त्या वेळी ज्या ठिकाणी आपण आहोत त्या ठिकाणच्या कोणत्याही अधिकारित व्यक्तीची मदत आपण त्या व्यक्तीला मिळून देऊ शकतो , जसे कि शाळेतील शिक्षक, हॉटेलमध्ये मेनेजर , अधिकारी , बस मधील कंडकटर या सारख्या लोकांना आपण सांगू शकतो कि त्या ठिकाणी कोणी तरी त्रास देत आहे माला समजत नाही मी काय करू तुम्ही काही करू शकता का? अश्या पद्धतीने आपान मदत करू शकतो.
  3. दस्तावेज : – या पुढच्या मदतीच्या प्रकारा मध्ये आपल्या कडील फोन चा वापर करून घडणाऱ्या घटनेचे आपण चित्रीकरण करू शकतो फोटो काढू शकतो किंवा विडीओ करू शकतो .जेणे करून ती व्यक्ती ला तक्रार करायची असेल तर पुरावा म्हणून वापरू शकते . परंतु हे करत असताना आपण काही गोष्ठी ची काळजी घेणे गरजेचे आहे , जसे कि कोणालाही हि माहिती पाठवता कामा नये . त्या याक्तीशिवाय
  4. विलंब : – पुढच्या प्रकार आहे विलंब या मध्ये आपल्या समोर काही घडत असेल आणि अ आपल्याला मदत करण शक्य नसेल त्या वेळी घटना घडून गेल्या नंतर त्या व्यक्ती जवळ जाणे आणि तिला आधार देणे , यामुळे एकतर त्या व्यक्तीच्या मनावर त्या घटनेचा परिणाम हा काही कमी होईल तिला यातून सावरण्या साठी मदत होईल .त्याचबरोबर कोणी तरी आपल्या सोबत आहे या मुले त्याली भीती वाटणात नाही अश्या पद्धतीने देखील आपण मदत करू शकतो .
  5. थेट : –  शेवटचा प्रकार आहे थेट या पद्धती मध्ये आपल्या समोर काही घडत असेल किंवा कोणी कोणाला त्रास देत असेल तर थेट जाऊन त्या याक्तीला थांबवणे आणि सांगणे कि तुम्ही जे करताय ते थांबवा यामुळे समोरच्या व्यक्तीला त्रास होत आहे .

 

अश्या पद्धतीने या ५ पद्धती वापरून आपण रस्त्यावरील होणाऱ्यां घटनांचे प्रमाण कामी करू शकतो आणि लोकना मदत करू शकतो .या प्रशिक्षणातून मला खूप काही शिकायला मिळाले .या प्रकारां मुले समाजात माणुसकी टिकून राहण्यास मदत होईल लोकांची मानसिकता बदलेले आणि हिंसाचाराचे प्रमाण कणी करण्यास मदत कोईल . आपान जास्तीत जास्त लोकाना याबाबत माहिती देणे गरजेचे आहे .समाजातील वाईट विचाराना आळा घालण्यासाठी या पद्धतींचा वापर केला पाहिजे.  म्हणून मी सुद्धा आता रस्त्यावरील होणाऱ्या घटना विरुद्ध उभी राहणार आणि मदत करणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

 

Your browser is out of date. It has security vulnerabilities and may not display all features on this site and other sites.

Please update your browser using one of modern browsers (Google Chrome, Opera, Firefox, IE 10).

X